ताज्या बातम्या :-
वर्धा शहरातील व्यावसायिक महेश बत्राला सश्रम कारावासासह दंड – INM24
Connect with us

वर्धा शहरातील व्यावसायिक महेश बत्राला सश्रम कारावासासह दंड

राज्य

वर्धा शहरातील व्यावसायिक महेश बत्राला सश्रम कारावासासह दंड

महेश बत्राला सश्रम कारावासासह दंड

शहरातील प्रतिष्ठित व्यावसायिक अशी ओळख असलेल्या महेश बत्रा याला न्यायालयाने बनावटी दस्ताऐवजाच्या भरवशावर कृषक जमीन अकृषक दर्शविल्याप्रकरणी दोषी ठरवत दोन वर्षांच्या सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हा निकाल न्या. आशीष अयाचित यांनी सोमवारी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

वर्धा : शहरातील प्रतिष्ठित व्यावसायिक अशी ओळख असलेल्या महेश बत्रा याला न्यायालयाने बनावटी दस्ताऐवजाच्या भरवशावर कृषक जमीन अकृषक दर्शविल्याप्रकरणी दोषी ठरवत दोन वर्षांच्या सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हा निकाल न्या. आशीष अयाचित यांनी सोमवारी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
सावंगी (मेघे) येथील मौजा १३९ मधील सर्वे नं. १९९ मधील भुखंड क्रमांक २५ हा प्लॉट जीवन तुकाराम पाठक यांना सन २००९ मध्ये १ लाख ३५ हजार रुपयांमध्ये विकण्यात आला. सदर जमिनीचा अकृषक परवाना हा बनावट दस्तऐवजाच्या आधारे तयार केल्याचे निदर्शनास येताच हे प्रकरण पोलीस कचेरीपर्यंत पोहोचले. सदर प्रकरणाचा तपास पूर्ण करून तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश चाटे यांनी प्रकरण न्यायप्रविष्ठ केले.
या प्रकरणी न्यायालयात सात जणांच्या साक्ष तपासण्यात आली. पुरावे व दोन्ही बाजूचा युक्तिवाद लक्षात घेऊन न्या. आशीष अयाचित यांनी आरोपी महेश बत्रा याला दोषी ठरवून दोन वर्षे सश्रम कारावास आणि एक हजाराचा दंड ठोठावला. तर आरोपी पटवारी चंद्रप्रकाश पिंपळे, लिपीक नरेश उघडे, पटवारी प्रवीण मेश्राम यांची निर्दोष मुक्तता केली. शासकीय बाजू अ‍ॅड. दीपाली गेडाम यांनी मांडली.
मृत नायब तहसीलदाराच्या नावाने बनविला ‘एनए’
सदर प्रकरणाचा तपास करताना आरोपींनी संगणमत करून बनावट दस्ताऐवजाच्या आधारे मृतक नायब तहसीलदार टोकेकर यांच्या नावाने अकृषक परवाना तयार केल्याचे उजेडात आले. याची दखलही न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान घेतली होती. विशेष म्हणजे, बनावट दस्तोऐवजाच्या जोरावर अनेक भुखंड कृषकचे अकृषक दर्शविण्यात आले आहे. काही प्रकरणे न्यायप्रविष्ठ असून त्यांच्या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

More in राज्य

Advertisement
Advertisement
To Top