ताज्या बातम्या :-
समीर देशमुख वर्धेतून लोकसभा लढणार? – INM24
Connect with us

समीर देशमुख वर्धेतून लोकसभा लढणार?

राज्य

समीर देशमुख वर्धेतून लोकसभा लढणार?

30 जानेवारी ला बुट्टी वाडा येथे दुपारी 1 वाजता राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या कार्यकत्या सोबत समीर देशमुख यांची चर्चा.
 वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांतील कार्यकर्ते आणि अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, वरूड व मोर्शी तालुक्यांतील कार्यकर्ते समीर देशमुख यांना भेटले. सर्व कार्यकर्तांनी एकच आग्रह केला की त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षा तर्फे येत्या लोकसभेची निवडणूक लढवावी.
सर्वांचा आग्रह व काही लोकांची आक्रमक भुमीका पाहता समीर देशमुख यांनी सर्वांना बसुन चर्चा करू अस सांगितले. मग एक एक करत खूप लोकांनी त्याची भुमीका, राग आणि रोष व्यक्त केला. त्यात प्रामुख्याने आघाडी झाली की दुसऱ्यांकडुन नुसत मतांनपुरता आपला वापर केला जातो आणि नंतर मुद्दाम दुर्लक्ष केले जाते, कोणतेही काम व मदत त्यांच्या कडून होत नाही मग या आघाडी ला काय अर्थ ? असा प्रश्न उपस्थित केला. आम्हाला आता तुम्हीच न्याय देऊ शकता कारण आपल्याशी जुळलेले लोक किंवा कार्यकर्ते हे एका गांवापुरते मर्यादित नसुन समपुर्ण जिल्हयात कार्यकर्त्यांची फळी आहे आणि ह्या सर्वांचा वीचार करता तुम्ही लोकसभेची निवडणूक लढा असा आग्रह केला. पक्षा कडून उमेदवारी भेटतली नाही तर मग आमच्या साठी अपक्ष लढा अस मत उपस्थित कार्यकर्त्यंनी व्यक्त केलं.
 2004 मध्ये समीर देशमुख यांनी सामाजिक व राजकीय कार्याची सुरवात केली. त्यांच्या सोबत प्रामाणिक असलेल्या लोकांना जाणीवपूर्वक त्रास दिला जातो आणि मुद्दाम त्यांचे काम केले जात नाही. आणि म्हणून वेळो वेळी त्यांच्या ह्या वागणुकीबद्दल त्यांनी आक्रमक भुमीका घेतली व आपली नाराजी व्यक्त करत असतात. कारण  त्यांच्याशी प्रामाणिक असलेल्या लोकांनवर कोणी अन्याय करत असेल तर ते त्यांना सहन होत नाही.
लोकसभेची उमेदवारी राष्ट्रवादीला मिळावी यासाठी पक्षाकडे समीर देशमुख यांनी मागणी केली आहे. कारण मागच्या निवडणूकीत काॅंग्रेस पक्षाचा 2 लाख पेक्षा जास्त मतांनी पराभव झाला होता. पण तरी सुद्धा काॅंग्रेस ला जर उमेदवारी मिळाली तर मग काय करायचं ? हा मोठा प्रश्न आहे. मी एकटा हा निर्णय घेणं योग्य नाही. म्हणून येत्या 10-15 दिवसात संपूर्ण मतदार संघाचा दौरा करून स्थानिक पक्षाचे नेते व कार्यकर्त्यंचे मत जाणून घ्याचे त्यांनी ठरवले आहे. ………   समीर देशमुख.

More in राज्य

Advertisement
Advertisement
To Top