ताज्या बातम्या :-
कामगारांवर अन्याय; संभाजी ब्रिगेडचा पालिकेला घेराव – INM24
Connect with us

कामगारांवर अन्याय; संभाजी ब्रिगेडचा पालिकेला घेराव

राज्य

कामगारांवर अन्याय; संभाजी ब्रिगेडचा पालिकेला घेराव

वर्धा : कामगारांच्या विविध मागण्यांसाठी शनिवारी संभाजी ब्रिगेडने प्रदेश संघटक तुषार उमाळे यांच्या नेतृत्वात पालिकेला घेराव घातला.
पालिकेतील सफाई कामगार, घंटागाडी चालक डम्पिंगमध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या कंत्राटी कामगारांना किमान वेतन आयोगाप्रमाणे १३ ते १४ हजार वेतन असताना केवळ सात सहा ते सात हजार वेतन दिले जाते. नियमाप्रमाणे २६ दिवस कामाचे असताना धमकावून ३० दिवस काम करून घेतले जाते तसेच कामाचे आठ तास असताना नियमबाह्य पद्धतीने दहा तास काम करून घेतले जाते. या कामगारांना साप्ताहिक सुटी, बोनस, घरभाडे भत्ता, पगारी रजा देणे गरजेचे असताना कंत्राटदार या सुविधा देण्यास टाळाटाळ करीत आहे. कामगारांना सेफ्टी किट पुरविणे आवश्यक असताना त्याही दिल्या जात नाही आहे. कामगारांनी नियमाप्रमाणे वेतन मागितल्यास कंत्राटदार चिन्मय कोठेकर आणि सुशांत मुळे यांच्याकडून कामगारांना कामावरून काढण्याची धमकी दिली जाते. कामगारांवरील या अन्यायाविरुद्ध नगर पालिकेला घेराव घालण्यात आला. मुख्याधिकारी उपस्थित नसल्याने अन्य अधिकाऱ्यांना निवेदन देऊन दोन दिवसांचा अवधी देण्यात आला. कामगारांना नियमाप्रमाणे वेतन व अन्य सुविधा दिल्या गेल्या नाहीत तर सोमवारी पुन्हा घेराव घालण्यात येईल, असा इशारा तुषार उमाळे यांनी दिला. त्यांनतर मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता करण्यात आली. पालिकेतील ठाकूर यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केलीे.
यावेळी अशोक वेले, राहुल बोबडे, रूपेश वाघमारे, पंकज सत्यकार, गजानन सातव, प्रशिक बैले, राहुल गजभिये, मयूर नगराळे, सागर जवादे, वैभव कदम, बादल जोगे, आधार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम खडसे, अ‍ॅड. अरुण येवले २०० ते ३०० कंत्राटी कामगारांचा मोर्चात सहभाग होता.

More in राज्य

Advertisement
Advertisement
To Top