ताज्या बातम्या :-
कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी तिसऱ्या कर्जमाफीचेही लाभार्थी ठरणार – INM24
Connect with us

कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी तिसऱ्या कर्जमाफीचेही लाभार्थी ठरणार

देश

कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी तिसऱ्या कर्जमाफीचेही लाभार्थी ठरणार

कोल्हापूर : राज्यात पहिल्यांदाच स्थापन झालेल्या ‘महाराष्ट्र विकास आघाडी’ने सत्तेवर आल्याच्या पहिल्याच दिवशी कृषिकर्ज कर्जमाफीची घोषणा केली आहे. यामुळे जिल्ह्यातील दीड लाखाहून अधिक शेतकरी सलग तिस-या कर्जमाफीचे लाभार्थी ठरणार आहेत. साधारणपणे एप्रिल ते सप्टेंबरअखेरपर्यंत २२०३ कोटींचे कृषिकर्ज वाटप झाले असून त्यात १४८५ कोटी रुपये निव्वळ पीककर्ज आहे.

मागील युती सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी शेतकरी सन्मान कृषी कर्जमाफी योजनेअंतर्गत कर्जमाफीचा लाभ दिला गेला. या योजनेतून थकीत पीक कर्जमाफी झाली; पण ती सरसकट न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. सत्तेत आल्यानंतर सरसकट कर्जमाफी देऊ, असे काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेनेही आपल्या जाहीरनाम्यात स्पष्ट केले होते. या तिघांची एकत्रित सत्ता स्थापन होत असताना शपथविधीआधीच समान कार्यक्रमाची घोषणा करतानाच पहिल्यांदा कृषिकर्जमाफीचे आश्वासन पूर्ण केले जाईल, असे जाहीर केले.

त्यानुसार जिल्ह्यातील शेतकºयांना पुन्हा एकदा कर्जमाफीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या महापुरामुळे बाधित झालेल्या ९७ हजार शेतक-यांना २६७ कोटी रुपयांची कर्जमाफी झाली आहे. त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी शेतकरी सन्मान योजनेतून दीड लाख शेतकºयांना ४४५ कोटींची कर्जमाफी झाली आहे. ही एकत्रित कर्जमाफी ७१२ कोटी रुपयांची होते.

आता नव्याने कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर याची माहिती मागविण्याचे काम सुरू होणार आहे. ही कर्जमाफी सरसकट असणार आहे, असे म्हटले जात असले तरी तिलाही निकष लावले जाणार असल्याने जीआर निघाल्यानंतरच नेमकी कुणाचे किती आणि कोणत्या स्वरूपाचे कर्ज माफ होणार हे ठरणार आहे. तरीदेखील आतापर्यंत वाटप झालेल्या कृषिकर्जाची माहिती घेतली असता १ एप्रिल २०१९ ते सप्टेंबर २०१९ या सहा महिन्यांच्या कालावधीत राष्ट्रीयीकृत, खासगी, ग्रामीण आणि सहकारी अशा बँकांतून २२०३ कोटी रुपयांचे कृषिकर्ज वाटप झाले आहे. त्यात एक लाख ५८ हजार ९९७ शेतकºयांनी १४८५ कोटींचे निव्वळ पीक कर्ज उचलले आहे. उर्वरित ७१८ कोटींचे कर्ज हे मध्यम व दीर्घ मुदतीचे कृषिकर्ज आहे.

एकूण कृषिकर्ज वाटप
बँक वाटप रक्कम (कोटींमध्ये)
राष्ट्रीयीकृत ६९४
खासगी २६५
ग्रामीण ०४
सहकारी १२४०
एकूण २२०३
—————————————-
पीककर्ज
बँक शेतकरी संख्या वाटप रक्कम (कोटींमध्ये)
राष्ट्रीयीकृत २६९२४ ३२३
खासगी ६१४८ ९५
ग्रामीण २४५ ०३
सहकारी १२५६८० १०६४
————————————
एकूण १५८९९७ १४८५

More in देश

Advertisement
Advertisement
To Top